हिवाळ्यानंतर आता महाराष्ट्र मार्च मध्ये तापणार असून मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे. यंदा उन्हाळ्यात मार्च ते मे महिनाचे किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. या दरम्यान उष्णतेच्या लाटा अधिक उष्ण राहणार आहे. मुंबई करांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
सध्या मुंबईत कमाल तापमानात घट झाली असून अधून मधून काही अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान उष्ण व दमट असणार आहे. या मुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे. काही वेळेस वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमान 33 ते 35 अंश सेल्सियस राहणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या मुळे मुंबईकरांना उष्णतेला सामोरी जावे लागणार आहे.