महाराष्ट्र विधानसभा निवडणुका यंदा वर्षाच्या अखेरीस होणार

Spread the love

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका यंदा वर्षाच्या अखेरीस होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपत आहे. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाही. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ काल रात्री मुंबई विमानतळावर पोहोचले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाचे एक पथक गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आले.आता लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार.

शुक्रवारी आणि शनिवारी आयोग राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अंमलबजावणी संस्था, केंद्रीय निमलष्करी दलाचे नोडल अधिकारी, विशेष पोलिस नोडल अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक (डीजीपी), प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेणार.

निवडणूक आयोग जिल्हा अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचीही भेट घेणार असल्याचे त्यात म्हटले आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी निवडणूक आयोग शनिवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याचे समजले आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता होण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *