पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि पोलिसांच्या मटन पार्टीची चर्चा चांगलीच रंगली. पुण्यात मुख्य कारवाई झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने गजा मारणे यास सांगली कारागृहात नेताना पुणे पोलिसांनी कणसे धाब्यावर मटन पार्टी केली होती.गपचूप केलेल्या मटन पार्टीची माहिती पुणे पोलीस आयुक्तांना मिळाली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट चार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निलंबन केले. त्यानंतर, आता गजा मारणेवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आलीय.पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गजा मारणेला पुन्हा एकदा दणका दिला असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.
मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये, दुचाकीसह अलिशान चारी चाकी गाड्यांचाही समावेश आहे.मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये, दुचाकीसह अलिशान चारी चाकी गाड्यांचाही समावेश आहे.2 टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन यासह आणखी 4 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेकडून टोळीतील सदस्यांच्या दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.मारणे टोळीकडून आत्तापर्यंत पुणे पोलिसांनी 10 ते 15 गाड्या जप्त केल्या आहेत, त्यामध्ये अलिशान 4 चाकी गाड्यांचा समावेश आहे.गजा मारणे पुण्यातील कुख्यात गुंड आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांचा खून झाला होता, या प्रकरणात गजा मारणेला अटक झाली होती. त्यामुळे तो 3 वर्षे येरवडा कारागृहात होता.