लेखणी बुलंद टीम:
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिबाबाद पोलीस स्टेशन परिसरात 20 वर्षीय एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. एका पोलीस अधिकारींनी ही माहिती दिली आहे. दिल्लीतील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीच्या मानसिक आरोग्यावर उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार साहिबाबादचे पोलीस अधिकारी म्हणाले की, “मृत विद्यार्थिनी तिच्या आई-वडिलांसोबत ग्रुप हाउसिंग सोसायटीत राहत होती. सोमवारी तिने अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला.
तसेच “तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले की, ती सुमारे दीड वर्षांपासून नैराश्यात होती. तिच्या उपचारासाठी सल्ला घेत होते.