Samsung आणि Poco ला टक्कर द्यायला बाजारात आलाय Lava Shark 5G,खूपच स्वस्त…

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

स्मार्टफोन निर्मिती कंपनी असलेल्या लाव्हा कंपनीने आता तिचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स लाँच केला आहे. ८ हजाराहून कमी किंमत असलेल्या या Lava Shark 5G स्मार्टफोनची टक्कर आता बाजारातील Samsung आणि Poco सारख्या स्मार्टफोन्सशी होणार आहे. या लाव्हा स्मार्टफोनमध्ये एंड्रॉईड 15 आऊट ऑफ द बॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम दिलेली आहे. जिच्या मदतीने क्लीन सॉफ्टवेअर एक्सपीरियन्स मिळणार आहे. गोल्ड आणि ब्ल्यू कलर ऑप्शन्समध्ये बाजारात उतरवण्यात आले आहे. हा फोन ग्लॉसी फिनिश बॅक डिझाईनसह बाजारात उतरवण्यात आला आहे.

Lava Shark 5G Price in India
लाव्हा कंपनीचा हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये बाजारात उतरवलेला आहे. हा फोन केल ७ हजार ९९९ रुपयात तुम्हाला मिळणार आहे. या फोनची विक्री ऑफीशियल स्टोअर आणि ऑफलाईल रिटेल स्टोर्सवरुन होत आहे. सध्या या फोनसोबत कोणतीही लाँच ऑफर दिलेली नाही. कारण या फोनची किंमत आधीच कमी आहे.

लाव्हा कंपनीचा हा स्वस्तातला 5 जी स्मार्टफोन SAMSUNG Galaxy F06 5G ( किंमत 7999 रु.) आणि POCO C75 5G (किंमत 7699 रु.) सारख्या स्मार्टफोन्सला टक्कर देणार आहे.

Lava Shark 5G Specifications
डिस्प्ले: या फोनमध्ये 90 हर्ट्स रिफ्रेश रेट सह 6.75 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे.

प्रोसेसर: लाव्हा ब्रँड या लेटेस्ट फोनमध्ये 6nm प्रोसेस बेस्ड यूनिसॉक टी 765 प्रोसेसरचा वापर केला आहे.या फोनमध्ये 4 जीबी रॅम आहे. परंतू व्हर्च्युअल रॅम की मदतीने त्यास 8 जीबीपर्यंत वाढवता येते.

इंटर्नल स्टोरेज : या हँडसेटमध्ये 64 जीबीची इंटर्नल स्टोरेज मिळत आहे. त्यास मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.

कॅमरा सेटअप: रिअरमध्ये 13 मेगापिक्सल ड्युअल कॅमरा सेटअप आणि फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा सेंसर दिला आहे.

बॅटरी क्षमता: 5000mAhच्या दमदार बॅटरी फोनमध्ये 18 वॅट फास्ट चार्ज सपोर्ट करते. परंतू रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला 10 वॉटचा चार्जर मिळणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *