सिक्कीमच्या लष्करी छावणीत भूस्खलन, सहा सैनिक बेपत्ता,तीन जवानांचा मृत्यू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सिक्कीममधून मोठी बातमी समोर येत आहे, सिक्कीमच्या लाचेन येथे एका लष्करी छावणीत भूस्खलन झालं आहे. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. तर सहा सैनिक बेपत्ता आहेत. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, लाचेन येथे भूस्खलन झालं आहे. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जवान बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता असलेल्या जवानांचा शोध सुरू आहे. अत्यंत आव्हानात्मक भूभाग आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये बचाव पथकांचं काम सुरू आहे. मंगन जिल्ह्यातील लाचेनमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, अतिमुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे.

या भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे, तीन सैनिक शहीद झाले असून, सहा सैनिक बेपत्ता आहेत. भूस्खलनानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी तात्काळ बचाव कार्य सुरू केलं. घटनास्थळावरून चार जवानांना वाचवण्यात यश आलं आहे, ते या घटनेत जखमी झाले आहेत. तर हवालदार लखविंदर सिंग, लान्स नाईक मनीष ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लखारा या जवानांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

भारतीय सैन्य दलाकडून या घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे, या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लाचेन येथे भूस्खलन घडून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, अशा दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत, या जवानांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या घटनेत अद्यापही सहा जवान बेपत्ता असून, घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे दुर्घटना

मंगन जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस झाला आहे, जोरदार पावसामुळे मंगन जिल्ह्यातल्या लाचेनमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. तर सहा जवान अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, आव्हानात्मक भूभाग असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *