“कृपया हमारे बिल्डिंग मे कोई भी वोट मागणे नही पधारे !”;मीरा-भाईंदरच्या पोरवाल कॉम्प्लेक्समधील नागरिकांची उमेदवारांवर नाराजी

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मिरा -भाईंदर प्रतिनिधी  :  राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे अशातच नेहमीच चर्चेत असणारे मिरा  – भाईंदर शहर आज आगळावेगळा निर्णय एका पोरवाल कॉम्प्लेक्स सोसायटीने भाईंदर पश्चिम येथील विभागातील उमेदवारांना कॉम्प्लेक्स मध्ये उमेदवारांना परवानगी मते मागण्यासाठी नाकार दिला आहे.

त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या समोर एक भले मोठे हिंदी भाषेत बॅनर छापून स्पष्ट लिहिले आहे. कृपया हमारे बिल्डिंग मे कोई भी वोट मागणे नही पधारे !

त्यांनी आवाहन केले आहे की मते मागासाठी आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये कोणालाही थारा नाही . याचाच अर्थ की कॉम्प्लेक्समधील नागरिकांनी मीरा-भाईंदरच्या शहरातील नेत्यांना पाठ दाखवले आहे.

पण सध्या उमेदवार आता संम्रभित झालेत हिंदी भाषिक उमेदवारांना पोरवाल संकुल मध्ये नकार देत हिंदी भाषेत संदेश लिहून सूचना देण्यात आले आहे पण ते फक्त हिंदी भाषिक उमेदवारांसाठीच आहे का असे नागरिकांचा सवाल ?

माहितीनुसार सोसायटीच्या फलकाच्या मागे काय उद्दिष्ट आहे हे विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की पाच वर्षांमध्ये आमच्या सोसायटीसाठी कुठल्याही प्रकारचे कोणतेही नेते कुठलेही काम करत नाहीत तर यावेळेस आम्ही पूर्ण सोसायटीने मिळून निर्णय घेतला आहे की कोणत्याही उमेदवाराला मते मागण्यासाठी न येण्याची विनंती केली आहे. सोसायटीने गेटच्या समोर फलक लावून असा अजब वेगळा बॅनर उमेदवाराना एक प्रकारचा धक्का दिला आहे बॅनर लावत उमेदवारांना नाकारले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *