कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू, पुतळ्याचे दहन..

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बुधगाव येथे मंगळवारी दहन करण्यात आले. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे व उमेश देशमुख यांनी दिला.

विधानसभा अधिवेशन सूरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नावर चर्चा सुरु होती. त्याच वेळी मंत्री रमी खेळत असल्याचे निदर्शनास आले. याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याचे खराडे असल्याचे खराडे म्हणाले. या पूर्वीही त्याची अनेक विधाने वादग्रस्त झाली आहेत. एक रुपयात पीक विमा योजेनेचा संदर्भ घेत आता भिकारीही एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा घेतो, या विधानाने त्यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ लक्षात येते. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचनाम्याविषयी बोलताना ढेकळाचा पंचनामा करायचा काय अशी बेताल विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असेही खराडे म्हणाले.

यावेळी प्रवीण पाटील, अधिक पाटील, विक्रम पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर साळुंखे, उमेश एडके, मनोहर पाटील, खान पठाण, सचिन पाटील, सयाजी कदम, धनाजी पाटील, पी एम पाटील, अमर पाटील, रामदास गुरव, बाळु पाटील, निलेश बाबर, अनिल कोकाटे आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *