जाणून घ्या डी व्हिटॅमिन मिळण्यासाठी सूर्यप्रकाशात कोणत्या वेळी बसले पाहिजे,वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

 हल्ली अनेकांना शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवतेय, ज्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतोय. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून विविध प्रकारची औषधे दिली जातात, तसेच नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात बसण्याचा सल्ला दिला जातो, पण सकाळच्या कोवळ्या उन्हातून शरीरास पुरेसे व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी सूर्यप्रकाशात कोणत्या वेळी बसले पाहिजे, याविषयी तुम्हाला माहितेय का? तसेच शरीरासाठी व्हिटॅमिन डी किती महत्त्वाचे आहे आणि जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा शरीरावर नेमका काय परिणाम होतो, याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊ..

सकाळी सूर्यप्रकाशात कोणत्या वेळी आणि किती वेळ बसावे?
जनरल फिजिशियन डॉ. मंजिता नाथ दास यांच्या मते, “सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंतचा वेळ हा चांगला असतो, विशेषतः उत्तरेकडील भागात जिथे खूप उष्ण आणि शुष्क तापमान असते. सकाळी कोवळ्या उन्हात १५ मिनिटे उघडं बसल्यास शरीरास पुरेश्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. पण, तुम्ही सूर्यप्रकाशात बसताना स्लीवलेस आणि शॉर्ट्स परिधान करू शकता.

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे कसे ओळखायचे?
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता विविध लक्षणांमधून दिसून येते, ज्यामध्ये सतत थकवा, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी आणि अधूनमधून किंवा सतत हाडांचे दुखणे जाणवू शकते.

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरता असल्यास त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात?
शरीरात व्हिटॅमिन डीच्या दीर्घकालीन कमतरतेमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हाडं कमकुवत होतात, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. या स्थितीमुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टरांकडून नियमित व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेण्याची शिफारस केली जाते. शरीरात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवल्यास इंजेक्शन्सची आवश्यकता असू शकते. योग्य उपचार घेतल्यानंतर काही आठवड्यांतच ही लक्षणं कमी होऊन आराम मिळतो.

ज्या व्यक्तींना कमी प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो, त्यांना शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवण्याचा धोका वाढतो. विशेषत: असे लोक, जे पूर्णवेळ घरात असतात. जसे की वृद्ध आणि दीर्घकाळापासून आजारी असलेले लोक.

याव्यतिरिक्त गडद रंगाची त्वचा असलेल्या व्यक्तींच्या शरीरात मेलेनिन वाढल्यामुळे त्यांना सूर्यप्रकाशापासून कमी व्हिटॅमिन डी मिळते, जे त्यांचे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. या घटकांमुळे या लोकांना व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.

तुम्ही सतत जर एसीमध्ये काम करत असाल आणि कारने प्रवास करत असाल तर अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही दरमहा व्हिटॅमिन-डीचे डोस घेतले पाहिजेत, असे डॉ. मंजिता सांगतात.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *