जाणून घ्या, हवामान खात्यानुसार उद्या मुंबईचे हवामान कसे असेल

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

IMD च्या ताज्या हवामान अद्यतनात विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वारे (30-40 किमी प्रतितास) असतील.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.

 

भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील २४ तासांत पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला असून, शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस आणि गडगडाटासह अंशत: ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पिवळा इशाराही जारी केला असून, राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.पुढील २४ तासांत शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे.

 

कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच, शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून हलक्या सरी पडल्या आणि त्यानंतर काही दिवस पावसाने हाजेरीच लावली नाही. मात्र, मंगळवारी सकाळपासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मरोळ, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली या भागात पावसाने हजेरी लावली. तापमानात घट झाली असून, दोन आठवड्यांहून अधिक काळ उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

 

देशाच्या काही भागात मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने (IMD) बुधवारी (21 ऑगस्ट) 18 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.राजस्थानमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ती तीन दिवस सुरू राहणार आहे. मध्य प्रदेशातही मुसळधार पावसामुळे कालीसिंध, चंबळ आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे राजस्थानने या नद्यांवर बांधलेल्या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या कोकणात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पुढील दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत आज आणि उद्या अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपात पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *