लेखणी बुलंद टीम:
महिलांना बचतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. वेगवेगळ्या बँका, पोस्ट ऑफिस यातर्फे या योजना राबवल्या जातात.महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजनादेखील अशीच एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 7.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.
ही एक शॉर्ट टर्म सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेत कोणतीही महिली गुंतवणूक करू शकते. या योजनेचा मॅच्यूरिटी पिरियड दोन वर्षे आहे.या योजनेत कोणतीही महिला कमीत कमी एक हजार रुपयांपासून जास्तीत जास्त दोन लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते.या योजनेत कोणत्याही वयाची महिला आपले खाते खोलू शकते. 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुली आपल्या आई-वडिलांच्या देखरेखीखाली या योजनेत खाते खोलू शकतात.मुदतीआधी खातेधार महिलेने खाते बंद केल्यास त्या महिलेला गुंतवणुकीवर 7.50 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के व्याज मिळते.