जाणून घ्या,आजचा 22 आणि 24 कॅरेट तोळा सोन्याचा दर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

भारतीय सराफा बाजारात आज (13 जानेवारी 2025) सोने दर स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. जागतिक सोने बाजाराशी स्वत:ला जोडून घेत भारतीय बाजारपेठेनेही आपले वर्तन त्यानुसार ठेवले. दरम्यान, असे असले तरी, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याने (24 Carat Gold Price) खरेदीदारांचे आकर्षण कायम ठवले. खरेदीदारांनी आणि गुंतवणुकदारांनी खरेदीस प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोने दर स्थिर राहिला तरी खरेदीचा ट्रेड कायम आहे.

भारतातील शहरनिहाय सोने दर
भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोने दर वेगवेगळे असतात. इथे दिलेले दर हे मूळ दर असतात. त्यामध्ये वस्तू सेवा कर आणि इतरही स्थानिक दर आणि घडणावळ लागून त्यात काहीसा बदल संभवतो. त्यामुळे अचूक दर पाहण्यासाठी जवळच्या सराफा बाजारास भेट द्या. प्रमुख शहरांतील दर खालील प्रमाणे:

शहर               22कॅरेट सोने दर 24 कॅरेट सोने दर
दिल्ली             Rs 73,550         Rs 80,070
मुंबई               Rs 73,400        Rs 80,070
अहमदाबाद    Rs 73,450         Rs 80,120
चेन्नई               Rs 73,400        Rs 80,070
कोलकाता      Rs 73,400         Rs 80,070
पुणे                 Rs 73,400        Rs 80,070
लखनऊ         Rs 73,550         Rs 80,220
बंगळुरु          Rs 73,400         Rs 80,070
जयपूर           Rs 73,550          Rs 80,220
पाटणा           Rs 73,450          Rs 80,120
भुवनेश्वर         Rs 73,400         Rs 80,070

भारतातील सोने दरांवर परिणामकारक ठरणारे घटक
भारतातील सराफा बाजारात सोने दर सातत्याने चढ-उतार पाहात असतात. ज्यामुळे ग्राहाकांनाही एका अनिश्चिततेच्या भावनेतूनच या खरेदीकडे पाहावे लागतात. अर्थात पाठमागील काही वर्षांची कामगिरी पाहिली तर सोने दर चढेच राहिले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड: जागतिक सोन्याच्या किमती प्रमुख भूमिका बजावतात.

आयात शुल्क आणि कर: हे सोन्याच्या देशांतर्गत किमती निश्चित करतात.

चलन विनिमय दर: रुपयाच्या मूल्यातील चढउतार किमतींवर परिणाम करतात.

पुरवठा आणि मागणीची गतिशीलता: सण आणि लग्नांच्या काळात मागणी किमतीवर परिणाम करते.

भारतातील सोन्याचे सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व
भारतीय संस्कृतीत सोन्याला आदरणीय स्थान आहे, विशेषतः सण, लग्न आणि शुभ प्रसंगी. ते केवळ समृद्धीचे प्रतीक नाही तर एक विश्वासार्ह गुंतवणूक देखील आहे. दरम्यान, बाजारपेठेतील ट्रेंड चढ-उतार होत असताना, खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांसाठीही सोन्याच्या दैनंदिन दरांबद्दल माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज स्थिर किमती नोंदवल्या गेल्या असल्याने, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने भारतीय घरांमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. विविध सण उत्सवांमध्ये सोने खरेदीचा ट्रेंड भारतीयामध्ये पिढ्यानपिढ्या पाहायला मिळतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *