भारत-पाकिस्तान तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 स्थगित करण्यात आली होती. परंतु आता दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीचा निर्णय झाला. त्यामुळे आयपीएल पुन्हा देशभरात सुरु होणार आहे. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) स्पर्धा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता सामने केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात होणार आहे. सामन्याची नवीन तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. आयपीएलचे अजून १६ सामने राहिले आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी झाली आहे. त्यामुळे आता केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात सामने होणार आहे. यापूर्वी आयपीएलची सामने केवळे बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये होणार आहे, असे वृत्त आले होते.
बीसीसीआयची महत्वाची बैठक आज होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत आयपीएलचे सामने पुन्हा सुरु करण्याबाबत निर्णय होणार आहे. काही खेळाडू त्यांच्या देशात परत गेले आहे. त्यांची उपलब्धता लक्षात घेऊन आयपीएल सामन्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आता आयपीएल लीग टप्प्यात फक्त 12 सामने शिल्लक आहेत. त्यानंतर चार प्लेऑफ सामने होणार आहेत.
IPL चे या हंगामातील 57 सामने पूर्ण झाले आहेत. 58 वा सामना 8 मे रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे होणार होता. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात हा सामना सुरु झाला होता. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे 10.1 षटकानंतर हा सामना थांबवला. पंजाब किंग्सने 10.1 षटकात 1 गडी गमावून 122 धावा केल्या होत्या. प्रियांश आर्यने 5 चौकार आणि सहा षटकाराच्या मदतीने 34 चेंडूवर 70 धावा केल्या. प्रभसिमरन सिंह याने 28 चेंडूचा सामना करत 50 धावा केल्या होता. आता हाच सामना पुढे सुरु होणार आहे की नवीन सामना खेळणार? याबाबत निर्णय झाला नाही.
2009 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएल दक्षिण आफ्रिकेत झाली होती. 2020 मध्ये एप्रिल-मे मध्ये कोविडमुळे यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते.