सोन्याच्या किमती जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर 

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सामान्य लोकांना सोनं चांदी घेणं परवडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सोमवारी सोन्याचा दर 29 रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचा दर हा 69729 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दरात 76 रुपयांची वाढ झाली आहे. 80336 किलो आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे नवीन दर.

 

कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
चेन्नई – 69905
मुंबई – 69260
दिल्ली – 69410
कोलकाता – 69260
अहमदाबाद – 69310
जयपूर – 69850
पटना – 69310
लखनौ – 69410

 

सोन्याचा हॉलमार्क कसा तपासायचा?

सर्व कॅरेटचा हॉलमार्क क्रमांक भिन्न असतो. उदाहरणार्थ, 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. यामुळे त्याच्या शुद्धतेमध्ये शंका नाही.

 

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची माहिती

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या 8955664433 क्रमांकावर कॉल करावा लागेल. मिस्ड कॉलच्या काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे दर कळू शकतात. याशिवाय, तुम्ही अधिकृत वेबसाइट  www.ibjarates.com    वर जाऊन दर देखील तपासू शकता.

 

अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीच्या दरात झाली होती घसरण?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात झपाट्याने घट झाली असून, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम जवळपास 5 हजार रुपयांनी घसरून 68 हजार रुपयांच्या खाली आले होते. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळं नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला होता. आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. जागतिक कारणांशिवाय आता देशांतर्गत कारणांमुळेही सोन्याच्या किमती वाढू शकतात. लोकांना भीती आहे की कस्टम ड्युटी हटवल्यानंतर सरकार सोन्यावरील जीएसटी वाढवू शकते. सध्या सोन्या-चांदीवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. सरकार ते 5 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. सोन्यावरील जीएसटी वाढवल्यास लोकांना सोनं आणखी महाग मिळू शकते.

आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात तेजी येत आहे. भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती वाढण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडं देशांतर्गत किमतींना सरकारकडून पाठिंबा मिळत असल्याचंही बोललं जातंय.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *