WhatsApp हा आता मोबाईलचाच नाही तर अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. व्हॉट्सॲपशिवाय अनेकांचे पान हालत नाही. मॅसेजिंगपासून ते ऑडिओ-व्हिडिओ कॉलपर्यंत अनेकांना या आधुनिक मॅसेजिंग ॲपची वेळोवेळी गरज भासते. युझर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. या नवीन फीचर्समुळे युझर्सचा अनुभव अजून चांगला होतो. त्यांना सुविधा मिळते. युझर्स कम्युनिकेशन अजून चांगले व्हावे यासाठी हे चार नवीन फीचर्स त्यात जोडण्यात येत आहेत. काय आहेत हे नवीन फीचर्स, कसा होईल त्याचा फायदा?
चॅट मॅसेज ट्रान्सलेट फीचर
युझर्स कम्युनिकेशन अजून चांगले करण्यासाठी कंपनीने चॅट मॅसेज ट्रान्सलेट हे फीचर आणले आहे. या आधारे युझर्स ग्रुप कॉल्समध्ये सहभाग नोंदवू शकतील. व्हिडिओ कॉल करताना स्नॅप आणि इन्स्टाग्राम प्रमाणे पप्पी ईअर सारखे मजेदार इफेक्ट्सचा वापर करू शकतील.
ग्रुप कॉलवर सदस्याची निवड करण्याची मुभा
पूर्वी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कॉल करण्यासाठी ग्रुपमधील सर्व सदस्यांना एकदाच नोटिफिकेशन जात होते. त्यातून ज्याला इच्छा असेल तो या कॉलमध्ये जॉईन होत होता. पण आता व्हॉट्सॲपने सदस्य निवडण्याची नवीन सुविधा आणली आहे. त्यामुळे ग्रुप कॉल केला असला तरी सर्व ग्रुप सदस्यांना त्रास होणार नाही. तुम्ही ज्यांना या ग्रुप कॉलमध्ये जोडू इच्छिता त्यांनाच नोटिफिकेशन जाईल.
WhatsApp Video Calls साठी New Effects
WhatsApp ने आता व्हिडिओ कॉल अजून मजेदार करण्यासाठी नवीन फीचर आणले आहे. आता व्हिडिओ कॉल दरम्यान विविध इफेक्ट्सचा वापर करता येईल. आता तुम्हाला कॉल सुरू करण्यासाठी वा पुन्हा कॉल करण्यासाठी लिंक वा थेट मोबाईल क्रमांक डायल करण्यासारख्या इतर सुविधा मिळतील.
WhatsApp ची व्हिडिओ क्विलिटीत सुधारणा
याशिवाय WhatsApp ने व्हिडिओ गुणवत्ता अजून चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमचा मोबाईल अथवा डेस्कटॉप ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करू शकता. पूर्वीपेक्षा अधिक हाय रिझोल्यूशन्सचा व्हिडिओ आता दिसेल. अशा व्हिडिओची गेल्या काही वर्षांपासून युझर्स मागणी करत होते.