सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या आजाराने पिडीत व्यक्ती बऱ्याचदा पूर्णपणे निरोगी वाटतात आणि म्हणूनच आपल्याला लसीकरणाची गरज नाही असे त्यांना वाटते. वैज्ञानिक पुराव्यांनुसार की किडनीच्या सौम्य आजारामुळेही रुग्णांना संसर्ग, विषाणूशी संबंधित कर्करोग आणि लसीला मिळणारा प्रतिसाद कमी होण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात जेव्हा संसर्गाचे प्रमाण वाढते तेव्हा हे अधिक चिंताजनक ठरते. मुंबईच्या झेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट डॉ. विश्वनाथ बिल्ला, यांनी किडनीच्या विकाराने पिडित व्यक्तींसाठी लसीकरणाची भूमिका किती महत्त्वाची आहे ?रोगप्रतिकारक शक्ती आणि किडनीचे आजार तसेच त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय असावेत याविषयी काही टिप्स दिल्या आहेत
तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि किडनीचे आजार
मूत्रपिंड (किडनी) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. मूत्रपिंड तुमच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की दीर्घकालीन किडनीचा बिघाड असलेल्या रुग्णांमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७०% मृत्यू हे हृदयरोग आणि संसर्गामुळे होतात.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमागील विज्ञान:
सीकेडी (क्रोनिक किडनी डिसीज) रुग्णांमध्ये टी सेल्स म्हणजेच जे रोगप्रतिकारक प्रतिक्रियांचे नियमन करते आणि अति प्रतिक्रिया टाळते. स्वतःच्या शरीराच्या पेशींवर हल्ला होऊ देत नाही आणि ऑटोइम्यून प्रतिक्रिया नियंत्रित ठेवते अशा पेशी आणि बी सेल्स म्हणजेच बी लिम्फोसाइट्स ऍन्टीबॉडीज तयार करतात, जे आपल्या शरीराला विशिष्ट प्रतिजनांशी लढण्यास मदत करतात अशा दोन्ही पेशींचे प्रमाण कमी होते.मूत्रपिंडाच्या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते.
पावसाळ्यात वाढतोय संसर्गाचा धोका
पावसाळ्याच्या काळात, वाढलेली आर्द्रता, दूषित पाण्याचे स्रोत आणि रोग वाहक अशा डासांच्या प्रसारामुळे संसर्ग पसरण्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण होते. प्रमुख भारतीय शहरांमधील अभ्यासातून असे दिसून आले आहे की पावसाळ्यात तीव्र तापाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या १३.२१% रुग्णांना तीव्र मूत्रपिंड दुखापत झाली आहे.
किडनी रुग्णांना धोका निर्माण करणारे पावसाळी संक्रमण:
• न्यूमोनिया आणि श्वसन संक्रमण
• डेंग्यूचा ताप
• मलेरिया
• लेप्टोस्पायरोसिस
• गॅस्ट्रोएन्टेरिटिस
• टायफॉइडचा ताप
प्रतिबंधात्मक उपाय
१. न्यूमोकोकल लस: प्राणघातक न्यूमोनियापासून संरक्षण
न्यूमोकोकल न्यूमोनियामुळे ५ ते ७ टक्के लोक मृत्युमुखी पडतात
न्यूमोकोकल कन्जुगेट लसी (PCV) मुळे सामान्य न्यूमोनियामध्ये ४५% घट होते आणि गंभीर न्यूमोकोकल रोगात ७५% घट होते
मूत्रपिंडाचे कार्य कमी असलेल्या व्यक्तींमध्ये एस न्यूमोनिया हॉस्पिटलायझेशन आणि बॅक्टेरिमियापासून संरक्षण मिळते.
लसीकरण वेळापत्रक:
मूत्रपिंडाचा आजार असलेल्या प्रौढांना PCV13 आणि PPSV23 दोन्ही लसींची आवश्यकता भासते.
1. PCV13 लस आणि मग 8 आठवड्यांनंतर PPSV23 लस
5 वर्षांनंतर: दुसरा PPSV23 डोस
1. इन्फ्लूएंझा (फ्लू) लस
CKD असलेल्या लोकांमध्ये, फ्लू लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे
इन्फ्लूएंझा किंवा न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण (14% घट) आणि आयसीयू प्रवेशात (81% घट) नोंद झाली.
इन्फ्लूएंझा लसीकरणामुळे मोठ्या प्रतिकूल हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटना, सर्व कारणांमुळे होणारे मृत्युदर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्युदर आणि मायोकार्डियल इन्फेक्शनचा धोका कमी होऊ शकतो. पावसाळा तीव्र होण्यापूर्वी दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत तुमचा फ्लू शॉट घ्यायला हरकत नाही. जेणेकरुन पावसाळ्यातीस संसर्गाचे प्रमाण रोखता येऊ शकते.
३. हिपॅटायटीस बी लस: दीर्घकालीन यकृताचे संरक्षण
हिपॅटायटीस बी संक्रमित डायलिसिस रुग्णांपैकी जवळजवळ ६०% रुग्णांना दीर्घकालीन किडनी विकाराचा धोका असतो
किडनी रुग्णांसाठी लसीकरणाचा डोस
सामान्य डोसच्या तुलनेत जास्त डोस (४० एमसीजी)
चांगल्या संरक्षणासाठी ६ महिन्यांत ४-डोस
नियमित अँटीबॉडीजची देखरेख
४. इतर आवश्यक लसी
हिपॅटायटीस ए: पावसाळ्यात यकृत संक्रमण रोखण्यासाठी महत्वाचे
टायफॉइड: दूषित पाणी/अन्नापासून महत्त्वपूर्ण संरक्षण
कोविड-१९: श्वसनाच्या आजारांपासून अतिरिक्त संरक्षण
काय काळजी घ्याल?
१. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. उघड्यावरील बर्फाचे सेवन टाळा.रस्त्यावरील अन्न पदार्थ किंवा पेयांचे सेवन टाळा.
२. योग्य स्वच्छता राखा. कमीत कमी २० सेकंद साबणाने हात धुवा. साबण उपलब्ध नसेल अशा ठिकाणी अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरा.बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी ओले कपडे ताबडतोब बदला.
३. डासांपासून संरक्षण करा. डास प्रतिबंधात्मक उत्पादनांचा वापर करा.सकाळी आणि संध्याकाळी लांब बाह्यांचे कपडे घाला. घराच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा.
४. ताजे,शिजवलेले, गरम अन्न खा. उघड्यावरील कापलेली फळे आणि कच्च्या भाज्यांचे सेवन टाळा.
उच्च-सोडियम असलेल्या पावसाळी स्नॅक्सचे सेवन टाळा.
५.कधीही स्वमर्जीने औषधोपचार करू नका,
कोणतीही नवीन औषधे घेण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका
१००°F (३७.८°C) पेक्षा जास्त ताप
सतत खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होणे,लघवी कमी होणे, पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे,तीव्र थकवा किंवा २४ तासांपेक्षा जास्त काळ उलट्या किंवा अतिसार होणे.