आम आदमी पार्टी (AAP) अरविंद केजरीवाल यांच्या जागी दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर अतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. घोषणेनुसार, दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सरकारमधील मंत्री आतिशी यांच्या नावावर एकमत झाले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सौरभ भारद्वाजसह अनेकांची नावे होती. मात्र आपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. केजरीवाल आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी केजरीवाल यांनी आज दुपारी साडेचार वाजता दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे. रविवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. जेव्हा लोक त्यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देतील तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू, असे ते म्हणाले होते. हे देखील
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर दिल्लीत लवकर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्लीतही नोव्हेंबर महिन्यात निवडणुका व्हाव्यात, अशी केजरीवालांची इच्छा आहे.मात्र, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या वर्षी दिल्लीत निवडणुका व्हाव्यात, अशी केजरीवाल यांची इच्छा आहे. आता दिल्लीत निवडणुका झाल्या तर त्याचा फायदा ‘आप’ला नक्कीच होईल, असे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला वाटते.