पुणे : जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित “जोशाबा समतापत्र” – वंचित बहुजन आघाडीचा 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले.
या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे –
• धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे!
• बोगस आदिवासींचे दाखले रद्द करू, हक्काच्या वन जमिनींचे वाटप करु
• जात जणगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावनी करण्यात येईल
• ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षणाचे ताट वेगळे ठेऊ.
• मोहम्मद पैगंबर बिल विधी मंडळात मंजूर करू
• महिलांना मिळणार मासिक ३५०० रुपये वेतन
• शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करणार
• सोयाबीन व कापूस वेचणी करणाऱ्यांना मनरेगाकडून ५ रुपये अनुदान देणार
• ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या पारलिंगी व्यक्तींना ५ हजार रुपये मासिक पेंशन देऊ
• नवीन उद्योगांना अनुदान देऊ
• सर्वांना KG ते PG शिक्षण मोफत देणार
• प्रति महिना घरगुती वापराची २०० युनिट वीज मोफत व ३०० युनिट वीज ज्येष्ठ नागरिकांना मोफत देणार
• अंगणवाडी सेविकांना, आशा कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊ
• गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करू
• बौद्ध अनुयायांना मोफत धम्म सहल
• बेरोजगार सुशिक्षित तरुण तरुणींना २ वर्षापर्यंत ५ हजार रुपये वेटिंग पिरियड भत्ता देऊ
वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा राज्यातील जनता स्वीकारेल आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मत देईल असा विश्वास ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख आणि पुण्यातील विधानसभा मतदासंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित जोशाबा समतापत्र – वंचित बहुजन आघाडीचा 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा.
जोशाबा समतापत्र हे आरक्षण बचाव यात्रा, बौद्ध समाज संवाद दौरा आणि आदिवासी सत्ता संपादन परिषदेत मिळालेल्या जनहितोपदेशातून व सूचनांवरून तयार करण्यात आले आहे.
जय फुले. जय शाहू. जय भीम. जय संविधान. जय भारत.
-ॲड. प्रकाश आंबेडकर
जोशाबा समतापत्र – वंचित बहुजन आघाडीचा 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा.
JHIRNAMA