सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सहाय्यक अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आसाम लोकसेवा आयोगाने 45 सहाय्यक अभियंता पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरच अर्ज करू शकतात. 15 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि इच्छुक उमेदवार 14 मे 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइट apsc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील. उमेदवारांना नियोजित तारखेच्या आत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उमेदवारांसाठी काय आहे पात्रता?
या भरती प्रक्रियेअंतर्गत, आसाम लोकसेवा आयोग (APSC) जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (स्थापत्य) च्या एकूण 45 पदे भरणार आहेत. शैक्षणिक पात्रतेबाबत सांगायचे झाल्याचे ज्या उमेदवारांनी बी.ई. मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते. दरम्यान, अर्ज करण्याची मुदत अद्याप सुरु झालेली नाही. 15 एप्रिलुपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
अर्जासाठी उमेदवारांनी किती फी भरावी लागणार?
दरम्यान, सहाय्यक अभियंता या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नेमकी किती फी असणार आहे? याबाबतचा प्रश्न सर्वांनाचं पडलेला असतो. तर सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 297.40 रुपयांचे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे साधारण 300 रुपये अर्ज भरण्यासाठी लागतील. तर दुसरीकडे OBC/MOBC आणि SC/ST/BPL/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही फी 197.40 रुपये आणि 47.20 रुपया ठेवण्यात आली आहे.
जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी या पदासांठी अर्ज करावा
दरम्यान, जे उमेदवार पात्र आहेत, त्यांनी या पदासांठी अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशा काळात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उमेदवारांना मिळणार आ हे. त्यामुळं पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा. दरम्यान, अर्ज करण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. 15 एप्रिलपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 14 मे 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळं अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही एक महिना चालणार आहे.