नोकरी अलर्ट! रेल्वे मध्ये ‘Technician’ पदासाठी 14298 जागांची भरती सुरू

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

Railway Recruitment Boards कडून RRB Technician Recruitment 2024 साठी नोंदणी सुरू केली आहे. आज 2 ऑक्टोबर 2024 पासून त्याची सुरूवात होत आहे. उमेदवार या भरती अंतर्गत Technician पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान RRB ची वेबसाईट rrbapply.gov.in वर त्यासाठी अर्ज करता येणार आहे. सुमारे 14298 जागांसाठी ही भरती होणार आहे. या 14,298 जागा या Technician Grade I आणि Grade III साठी असणार आहे. विविध झोन्स मध्ये ही नोकरभरती होणार आहे, यापूर्वी 9144 जागांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली होती आता त्यामध्ये वाढ करून 14298 करण्यात आल्या आहेत.

रेल्वे मधील नोकर भरतीतील महत्त्वाचे अपडेट्स
आज 2 ऑक्टोबर पासून सुरू झालेली ही प्रक्रिया 16 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. मॉडिफिकेशन विंडो 17 ऑक्टोबरला खुली केली जाणार आहे तर 21 ऑक्टोबरला बंद होणार आहे. प्रत्येक मॉडिफिकेशन साठी 250 रूपये मोजावे लागणार आहेत. उमेदवारांना एक Computer Based Test, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि मेडिकल टेस्ट करून उमेदवार निवडले जाणार आहेत.

RRB Technician Recruitment 2024 साठी कसा कराल अर्ज?

rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

apply link वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर अकाऊंट मध्ये लॉगिन करा.

अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरून पैसे देऊन रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर confirmation page डाऊनलोड करा.

इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन

ज्या उमेदवारांनी पूर्वीच अर्ज केला आहे आणि फी भरली आहे त्यांना

existing candidates म्हणून नोंदवलं जाणार आहे. त्यांना आता या विंडो मध्ये अधिकची फी भरावी लागणार नाही.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *