नोकरी अलर्ट! नगरचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती,तब्बल इतका पगार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

महाराट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकरी करण्याची इच्छी असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 2055 पदांसाठी विविध सेवांमधील 5 जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. आता आणखी एका सरकारी विभागातील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत अनुरेखक पदांची भरती करण्यात येणार आहे. पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील गट क संवर्गातील अनुरेखक पदांची भरती केली जाणार आहे.

अनुरेखक पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना www.urban.maharashtra.gov. in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतील. अनुरेखक पदासाठी 18 ऑक्टोबर पासून 17 नोव्हेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येतील. या भरतीची जाहिरात रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या https://ese.mah.nic.in या वेबसाईटवर पाहता येईल.

शैक्षणिक पात्रता
अनुरेखक पदासाठी उमेदवारांनी बारावीनंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे आरेखक पाठ्यक्रम (स्थापत्य) प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता मिळवलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) (Auto-CAD) किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System in Spatial Planning) उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे.

अनुरेखक पदाची परीक्षा कधी होणार?
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्यावतीनं ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात अपडेटस साठी www.dtp.maharashtra.gov.in ला सातत्यानं भेट देणं आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत अधिक अर्ज दाखल झाल्यास विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणर आहे.

अनुरेखक या पदासाठीची परीक्षा दोन स्तरांवर घेण्यात येणार असून प्रथमतः बहुपर्यायी ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये किमान 45 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या पात्र उमेदवारांचीच व्यावसायिक चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

अर्ज कधी करायचा?
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 18 ऑक्टोबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे.

वयोमर्यादा :

अनुरेखक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 वर्षे पूर्ण ते 38 वर्षांदरम्यान असावं.राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्यांसाठी वयोमर्यादा 43 वर्ष असेल. तर,पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 55 वर्षांपर्यंत आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *