जॉब अलर्ट ! कृषी विभागामध्ये भरती, कोण अर्ज करू शकतो?

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

कृषी विभागात (Agriculture Department) नोकरीसाठी (Job) प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थान सरकारने (Rajasthan Government) कृषी विभागातील नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. राजस्थान कर्मचारी निवड आयोगाने (RSMSSB) कृषी पर्यवेक्षक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 1100 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 944 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत आणि 156 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत.

आयोगाने माहिती दिली आहे की लवकरच या भरतीची सविस्तर अधिसूचना rssb.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल, ज्यामध्ये ऑनलाइन अर्ज, शेवटची तारीख, परीक्षेची तारीख आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल.

कोण अर्ज करू शकतो?
बी.एससी. (कृषी) किंवा बी.एससी. (कृषी फलोत्पादन) पदवी असणे आवश्यक आहे. जर एखाद्याकडे बी.एससी. नसेल, तर 12 वी (कृषी विषय) उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवाराला देवनागरी लिपीत हिंदी लिहिणे आणि वाचण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि राजस्थानच्या संस्कृतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती असेल?
भरतीसाठी वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 नुसार मोजली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, राखीव श्रेणींना वयात सूट मिळेल. याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर जाहिरातीत दिली जाईल. दरम्यान, वय वर्ष 40 पर्यंत जे उमेदवार पा्र आहेत, त्यांना कृषी विभागात नोकरीची मोठी संधी आहे.

वेतन आणि सुविधा
या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर-5 नुसार मासिक वेतन मिळेल. यासोबतच, राजस्थान सरकारकडून देण्यात येणारे सर्व भत्ते आणि सुविधा देखील दिल्या जातील.

लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु होणार
दरम्यान, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भरतीची सविस्तर अधिसूचना rssb.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळं उमेदवारांनी rssb.rajasthan.gov.in या बेवसाईटवर सवविस्तर माहिती पाहावी. या भरतीद्वारे एकूण 1100 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी 944 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत आणि 156 पदे अनुसूचित क्षेत्रांसाठी राखीव आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *