नोकरी अलर्ट! संरक्षण संशोधन आणि विकास संघटना मध्ये वैज्ञानिक पदांसाठी भरती जाहीर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सरकारी नोकरीची (Govt Job) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या संरक्षणात योगदान द्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने 2025 साठी वैज्ञानिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही संधी विशेषतः अशा तरुणांसाठी आहे की, ज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. देशासाठी काहीतरी मोठे करु इच्छितात त्यांच्यासाठी ही संधी आहे. इच्छुक उमेदवार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट rac.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरतीची अधिसूचना जूनच्या पहिल्या आठवड्यात रोजगार वृत्तात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांपर्यंत अर्ज करता येतील. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 148 शास्त्रज्ञांची पदे भरली जातील, ज्यामध्ये डीआरडीओ, एडीए आणि राखीव श्रेणींसाठीची पदे समाविष्ट आहेत.

काय आहे पात्रता?
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मेकॅनिकल, संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीची पदवी असलेले उमेदवारच भरतीसाठी पात्र मानले जातील. याशिवाय, त्यांच्याकडे GATE परीक्षेचा वैध गुण देखील असणे आवश्यक आहे. सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे ठेवण्यात आले आहे. ही मर्यादा ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

कशी होणार निवड प्रक्रिया?
अर्ज शुल्काबद्दल बोलायचे झाले तर, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, जे ऑनलाइन जमा केले जाईल. त्याच वेळी, अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. ही निवड प्रक्रिया GATE स्कोअरवर आधारित असेल. उमेदवारांची यादी 1:10 च्या प्रमाणात केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड GATE स्कोअरच्या 80 टक्के वेटेज आणि मुलाखतीच्या 20 टक्के वेटेजच्या आधारे केली जाईल.

दरम्यान, जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत, त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर लगेच अर्ज करावा. उमेदजवारांसाठी सरकारी नोकरीची ही मोठी संधी आहे. या नोकरीच्या माध्यमातून देशाच्या संरक्षणात योगदान देण्याची मोठी संधी मिळणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *