29 रिक्त पदांसाठी सिडकोमध्ये नोकर भरती (CIDCO Jobs) करण्यात येत आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 43 वर्ष आवश्यक आहे. 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती असल्याने त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. संबंधित क्षेत्रात स्पेशलायझेशन केलेले असावे. क्षेत्राधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी (Government Jobs)निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रुपये पगार मिळणार आहे.
नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येणार आहे. या परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाईल. 11 जानेवारी 2025 ही या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
सध्या दूरसंचार विभागातदेखील भरती सुरु आहे. दूरसंचार विभागात डिविजनल इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. 48 रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. त्यातील 4 रिक्त पदे ही मुंबईत भरती केली जाणार आहेत.