जॉब अलर्ट! 10 वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, कर्मचारी (गट डी) च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर

Spread the love

लेखणी बुलंद टीम :

सरकारी नोकरीच्या (Govt Job)  शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थान कर्मचारी निवड मंडळ (RSMSSB) ने वर्ग IV कर्मचारी (गट डी) च्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. फक्त 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी मिळणार आहेत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

53 हजार 749 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

राज्यातील एकूण 53 हजार 749 गट ड पदांच्या भरतीसाठी ही भरती मोहीम राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांची किमान पात्रता 10वी उत्तीर्ण असावी. जे विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेला बसले आहेत किंवा बसणार आहेत ते देखील अर्ज करू शकतात, परंतु परीक्षेपूर्वी शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

 किमान वय 18  वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे  असावे

या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 18  वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे ठेवण्यात आले आहे. तथापी, राजस्थानमधील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्ग (OBC), अत्यंत मागासवर्ग (MBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील (EWS) पुरुष उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2025

उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागेल. श्रेणीनुसार अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सामान्य श्रेणी आणि क्रीमी लेयर OBC/MBC श्रेणीसाठी 600 रुपये भरावे लागतील. नॉन-क्रिमी लेयर OBC/MBC, EWS, SC, ST श्रेणीसाठी 400 रुपये शुल्क आहे. त्याचबरोबर अपंगांना 400 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर फॉर्म भरा.

दरम्यान, ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा तरुणांनी या पदासांठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे 50 हजाराहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. दरम्यान, अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. जे उमेदवार पात्र आहेत, म्हणते ज्या उमेदवारांनी 10 वी पास च शिक्षण घेतलं आहे, ते उमेदवरा या पदांसाठी पात्र असणार आहे. त्यामुळं 19 एप्रिल 2025 च्या आधी उमेदवारांनी अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

,


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *