नोकरी अलर्ट!10-12 पास तरुणांसाठी मोठी संधी,वाचा सविस्तर

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

10 वी 12 वी शिक्षण झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. हरियाणा सरकारने CET (सामान्य पात्रता परीक्षा) परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार आता hssc.gov.in वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. गट क आणि गट ड साठी भरती प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उमेदवारांना सामाजिक आणि आर्थिक आधारावर अतिरिक्त पाच गुण दिले जाणार
उमेदवारांना सामाजिक आणि आर्थिक आधारावर अतिरिक्त पाच गुण दिले जाणार नाहीत. याशिवाय, आता 10 पट अधिक उमेदवार स्क्रीनिंग चाचणीसाठी निवडले जातील, तर आधी ही संख्या 4 पट होती. या बदलामुळे अधिकाधिक उमेदवारांना स्क्रीनिंग चाचणी देण्याची संधी मिळेल याची खात्री होईल, ज्यामुळे निवड प्रक्रियेत स्पर्धा वाढू शकते.

शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेअंतर्गत गट क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पात्रता 10वी उत्तीर्ण असावी. तर गट ड साठी पात्रता 12वी उत्तीर्ण आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 42 वर्षे दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.

अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागणार?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्याच वेळी, महिला, माजी सैनिक आणि इतर श्रेणींना 25 टक्के शुल्क सूट देण्यात आली आहे, म्हणजे त्यांना कमी शुल्क भरावे लागेल.

अलिकडच्या काळात सरकारी नोकरीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याचे दिसत आहे. कमी जागेसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज येत आहेत. त्यामुळं सहजासहजी नोकरी लागणे कठीण झाले आहे. त्यामुळं जे उमेदवार सरकारी नोकरीसाठी उत्सुक आहेत, त्यांनी लवकरात लवकर


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *