आटपाडी शहरात बसविलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवल्याने ठिय्या आंदोलन

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

सांगली : आटपाडी शहरातील सांगोला चौक येथे अज्ञातांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने पहाटे आंबेडकर यांचा पुतळा हटवला असल्याने पहाटे पासून पुतळा बसवलेल्या ठिकाणी आंबेडकर वादी संघटनानी ठाण मांडून बसले आहेत.

सांगोलाकडून येणारा रोड, दिघंचीकडून येणाऱ्या रोडवर सांगोला चौकात हा ठिय्या मारण्यात आला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाची स्थिती असली तरी नियंत्रणात आहे.

आटपाडी शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा, बाजार पटांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तसेच आबानगर चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला . शहरात प्रमुख महापुरुष यांचे पुतळे बसविण्यात आले होते. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नाही

पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत मोठ्या बंदोबस्तात पुतळा काढून घेतला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या भीमसैनिकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरच्या घटनेने मोठ्या संख्येने भीमसैनिक जमा झाले असून, ज्या पोलिसांनी पुतळा काढून नेला आहे, त्या पोलिसांनी सदर ठिकाणी पुतळा बसविला पाहिजे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरु आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *