वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना या रेल्वेत मिळणाऱ्या अन्नात आढळले किडे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

वंदे भारत रेल्वे ही आपल्या आलीशान प्रवासामुळे नेहमीच चर्चेत असते. या रेल्वेत सर्वच सुविधा उच्च प्रतीच्या आहेत. सर्व सोईसुविधांनी युक्त अशी ही रेल्वे असल्याचे बोलले जाते. मात्र याच रेल्वेतील एक किळसवणा प्रकार समोर आला आहे. ही घटना समजताच रेल्वे विभागानेही मोठा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना या रेल्वेत मिळणाऱ्या अन्नात किडे आढळले आहेत. तिरुनेलवेली ते चेन्नई अशा प्रवासाला निघालेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. ट्रेनमध्ये मिळणाऱ्या अन्नात किडे असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक काळ्या रंगाचा किडा सांबरमध्ये तरंगताना दिसतोय. या व्हिडीओमुळे वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काँग्रेसच्या खासदाराची टीका
या प्रकरणानंतर काँग्रेसचे खासदार मनकम टागौर यांनीदेखील वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करून एक्स या समाजमाध्यमावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रवाशांना चांगले जेवन मिळावे यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

रेल्वे विभागाने घेतला मोठा निर्णय
वंदे भारत ट्रेनमधील हा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे विभागानेही मोठी कारवाई केली आहे. रेल्वेने एक निवेदन सादर केले आहे. समोर आलेल्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, असं रेल्वेनं म्हटलंय. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार फुड इन्स्पेक्टरने रेल्वेतील जेवनाची चाचणी दिडीहुल रेल्वे स्थानकावर केली होती. जेवन पॅक करण्यात आलेल्या अॅल्यूमिनिअमच्या डब्यावरील कडांवर किडा आहे. तो जेवनात मिसलेला नाही, असं रेल्वे विभागानेम म्हटलंय. रेल्वे विभागाने संबंधित वंदे भारत ट्रेनमध्ये जेवन पुरवणाऱ्या कंत्राटदाराला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पहा व्हिडिओ:

 

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *