अमानुष! वडिलांनीच  केला मुलीवर वारंवार बलात्कार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. स्वतःच्या मुलीवर नराधम वडिल गेल्या पाच वर्षांपासून बलात्कार करत होता.मुलीने वडिलांच्या या कृत्याचा व्हिडीओ बनवून पोलिसांना दिला नंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक केली आहे.पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की , तिला दोन मोठे भाऊ आहे आणि आई मनोरुग्ण आहे.

पीडित मुलगी वडिलांच्या या कृत्यामुळे घरातून निघून गेली.पोलिसांनी तिला शोधल्यावर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकात पीडित तरुणी सापडली. मुलीला गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले, तेथे चौकशीदरम्यान तिने उघड केले की तिच्या वडिलांनी तिचे वारंवार लैंगिक शोषण केले होते,या प्रकरणाचा उलघडा झाला. पोलिसांना मुलीने सांगितले की मुलगी 12 वर्षाची असताना पासून तिचा पिताच तिच्यावर बलात्कार करत होता. मुलीने भावांना या प्रकाराबद्दल काहीच सांगितले नाही.

भाऊ तिला मारहाण करतील या भीतीपोटी तिने कोणाला काहीच सांगितले नाही. मुलीने अखेर कंटाळून वडिलांच्या या कृत्याचा व्हिडीओ बनवला आणि पोलिसांना दाखवला. हे ऐकून सर्वाना धक्काच बसला. पोलिसांनी शोध लावला आणि या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. पीडिते कडून वडिलांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *