भारतामध्ये स्वदेशी बनावटीचं पहिलं आरटी पीसीआर किट तयार

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सध्या देशात मंकीपॉक्सचे रूग्ण नाहीत पण सरकार कडून प्रतिबंधक योजना सुरू करण्यात आल्या आहे. भारतामध्ये स्वदेशी बनावटीचं पहिलं आरटी पीसीआर किट तयार करण्यात आले आहे. यामुळे मंकिपॉक्सचे निदान होणार आहे. Siemens Healthineers ने बनवलेलं हे IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay आहे. त्याला Central Drugs Standard Control Organisation ने देखील मंजूरी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्समुळे Public Health Emergency घोषित केली आहे. Clad-1,हा वायरसचा नवा स्ट्रेन समोर आला आहे त्याच्यामुळे मृत्यूसंख्येत आणि संसर्ग होण्याच्या शक्यतेमध्ये वाढ होत आहे.

IMDX Monkeypox Detection RT-PCR Assay हे molecular diagnostic testवर काम करतं. याच्या मदतीने clade I आणि clade II या दोन्ही वायरसच्या व्हेरिएंट्स तपासले जाऊ शकतात.

Siemens Healthcare Private Ltd च्या माहितीनुसार, या टेस्ट द्वारा निदान 40 मिनिटांमध्ये होणार आहे. ICMR-National Institute of Virology पुणे द्वारे या कीटला क्लिनिकली हिरवा कंदील देण्यात आला आहे. IMDX Monkeypox RTPCR Assay kits हा Indian statutory guidelines आणि ग्लोबल स्टॅडर्सचा असल्याचेही Siemens ने म्हटलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *