भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पीव्ही सिंधूच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. या महिन्याच्या २० तारखेपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होतील आणि आठवडाभर पीव्ही सिंधूच्या घरी लग्न विधी कार्यक्रम सुरू राहणार आहे. पीव्ही सिंधू हैदराबादमध्ये राहणाऱ्या व्यंकट दत्ता साईसोबत विवाह बंधनात अडकणार असून 24 सप्टेंबरला रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीव्ही सिंधूचे लग्न उदयपूरमध्ये तर रिसेप्शन हैदराबादमध्ये होणार आहे.
येथे पाहा पोस्ट:
https://twitter.com/toisports/status/1863632082527981703