आयकर विभागाला जंगलात सापडल तब्बल 52 किलो सोन,कोणाच आहे हे ऐकल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

रिअल इस्टेट व्यावसायिक त्रिशूल कंस्ट्रक्शन कंपनीचे मालक राजेश शर्मा यांच्या जवळच्या माणसांवर इनकम टॅक्स विभागाकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. या कारवाई दरम्यान टीमला कोट्यवधी रुपयांची कॅश आणि अनेक किलो सोन-चांदी सापडलं आहे. टीमला जंगलात एका क्रेटा कारमध्ये दोन बॅग सापडल्या. यात 52 किलो सोन सापडलं. त्याची किंमत भारतीय बाजारात जवळपास 42 कोटी रुपये आहे. त्याशिवाय भोपाळच्या माजी RTO कॉन्स्टेबलच्या घरातून 234 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही सर्व छापेमारीची कारवाई सुरु आहे.

माजी RTO कॉन्स्टेबलच्या घरातून इनकम टॅक्सच्या टीमला अडीच करोड कॅश, सोने-हीरे चांदीचे दागिने आणि लग्जरी गाड्या हस्तगत केल्या आहेत. जंगलात सापडलेली क्रेटा कार चेतन सिंह गौर नावाच्या व्यक्तीची आहे. तेच माजी आरटीओ कॉन्स्टेबलच नाव सौरभ शर्मा आहे. त्याने फक्त आठ वर्ष नोकरी केली. काही दिवसांपूर्वी सौरभने व्हीआरएस घेतली. अनेक मोठ्या लोकांशी त्याचा संपर्क आहे.

52 किलो सोन सापडलं, ती कार कोणाच्या मालकीची ?

आयकर विभागाच्या टीमला भोपाळच्या रातीबड क्षेत्रात मेंडोराच्या जंगलात बेवारस स्थितीत एक क्रेटा गाडी सापडली. यात दोन बॅग आणि 52 किलो सोनं होतं. सोबतच दहा कोटीची कॅश जप्त करण्यात आली. ज्या कारमध्ये सोनं आणि कॅश सापडली, ती गाडी चेतन सिंह गौर नावाच्या माणसाची आहे. तो ग्वालियरच्या लक्कडखाना भागात राहतो. चेतनचे वडील प्रताप सिंह सेंट्रल बँकेच्या मागे एका कोठीत राहतात. त्यांचं भाड्याच दुकान सुद्धा आहे. चेतनचा भोपाळमध्ये पेट्रोल पंप असल्याचही सांगितलं जातय. तो चार वर्षांपासून भोपाळमध्ये राहतोय. चेतन सिटी सेंटरमध्ये भाऊ मोनीसह वॉटर प्युरीफायर एजन्सी चालवायचा. चर्चा अशी आहे की चेतनला अलीकडेच एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे.

कपाटात 15 लाखाची लेडीज पर्स, 11 लाखाची हिऱ्याची अंगठी

आयकर विभागाने ज्या माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर छापेमारीची कारवाई केली त्याच नाव सौरभ शर्मा आहे. तो आरटीओमध्ये आरक्षक पदावर होता. वडिलांच्या मृत्यूनंतर आरटीओमध्ये अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी लागली. अवघ्या 8 वर्षाच्या नोकरीत त्याने मोठ्या प्रमाणात काळी कमाई केली. काही वर्षातच त्याने VRS घेतला. सौरभचा संबंध अनेक मोठे अधिकारी आणि मंत्र्यांशी आहे. सौरभ मूळचा ग्वालेरचा आहे. त्याचं भोपाळच्या अरेरा कॉलनीत मोठ घर आहे. सध्या तो कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. त्याच्या घरातून 234 किलो चांदी मिळाली आहे. त्याची किंमत 2 कोटी 10 लाख रुपये आहे. टीमला 17 ब्रँडड घड्याळ, 15 लाखाची लेडीज पर्स, दोन कपाटात पैसे मिळाले आहेत. यात 11 लाखांची हिऱ्याची अंगठी आणि 2.5 कोटी रुपये कॅश आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *