आहारात काही सुपरफूड्स समाविष्ट केल्यास हा थकवा दूर करता येतो. ही पाच नैसर्गिक आणि पौष्टिक अन्नपदार्थ तुमच्या शरीराला ऊर्जा देतात आणि ताजेतवाने ठेवतात. ओट्स हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत आहेहे शरीरात हळूहळू पचते आणि त्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते. सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाल्ल्यास दिवसभर थकवा जाणवत नाही.
प्राकृतिक साखर आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेला मध हे थकलेल्यांसाठी एक नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत आहेग्रीन टी किंवा गरम पाण्यात मध मिसळून घेतल्यास शरीराला चटकन ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.थकवा आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी ग्रीन टी हे उत्तम पेय आहेत्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतात आणि मन शांत करतात. दिवसातून १-२ वेळा ग्रीन टी घेतल्याने स्फूर्ती वाढते.
केळं हे कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशियमने भरलेलं सुपरफूड आहे.हे त्वरित ऊर्जा देतं आणि रक्तदाब नियंत्रित करतं. व्यायामानंतर किंवा सकाळी नाश्त्यात एक केळं खाल्लं तरी शरीर हलकं वाटतं.बदाम हे ऊर्जा देणारं सर्वोत्तम स्नॅक आहे. त्यात विटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर्स भरपूर असतात.यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि सततचा थकवा दूर होतो. दररोज ५-६ बदाम भिजवून खाल्ल्यास चांगले परिणाम दिसून येतात.