भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, उत्तन रोड, भाईंदर येथे भारतीय बौध्द महासभा मिरा भाईंदर शहर शाखेच्या पुढाकाराने व समाजाच्या सम्यक दानातून लुंबिनी बुध्द विहारमध्ये ( ज्ञानकेंद्र) जीर्णोद्धार करण्यात आला. उर्वरित वरील सभागृहाचे काम प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणारे अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्मित राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व आयु. निखिल मेश्राम साहेब (I.R.S) यांच्या विशेष सहकार्याने तसेच समितीचे सन्माननिय समन्वयक व समाज सवेक आयु. विनोद कांबळे साहेब व मिरा भाईंदर मधील सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेलं व्यक्तिमत्त्व आयु. अँड. तुषार गायकवाड साहेब यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून सदर ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या सम्यक हेतूने राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय / स्टडी सेंटर तयार करून देण्यात आले.
सदर ग्रंथालयाचा उदघाटन सोहळा भारतीय बौध्द महासभा मिरा भाईंदर शहर शाखेचे सन्माननिय अध्यक्ष आयु.सुभाष सुर्यभान ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. १३जुलै रोजी, सकाळी आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी उपस्थित उदघाटक आयु.राजेश गावंडे साहेब (I.F.S) तसेच प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, मुंबई सचिवालय शाखा प्रमुख परराष्ट्र मंत्रालय यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच बहुसंख्येने उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांच्याशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तर हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा करता योग्य ते मदतीने आश्वासित केले.
उपस्थित समितीचे समन्वयक आयु. सुधीर परमेश्वर साहेब यांनी AI (कृत्रिम तंत्रज्ञान) या विषयी माहिती दिली. त्याचबरोबर यांच्या हस्ते उत्तन शाखेच्या माध्यमातून वार्ड शाखेच्या अध्यक्षा आयु.नि. पार्वताताई पोहरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित नालंदा बुध्द विहार उत्तन येथील ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले. या सुंदर अश्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देत साहेबांचे स्वागत केले. आदर्श पूजन करून उदघाटन संपन्न झाले. तर उपस्थित उदघाटक व मान्यवर व कार्यक्रम अध्यक्ष यांचे शाल, पुष्पगुच्छ, संविधान उद्देशिका फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले. उदघाटक व मार्गदर्शक उपस्थित सर्वांचे विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले. सरणत्तय घेऊन कार्यक्रम हर्षोल्हासात संपन्न झाला.