पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेना (Shivsena) युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे (Nilesh Ghare) यांच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी थेट फायरींग केलं. काल (रविवारी) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या कारवर गोळी झाडली.(Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे हे गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसोबत उपस्थित होते, त्याचवेळी बाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवरती गोळीबार करत हल्ला झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)