पुण्यात 67 वर्षीय व्यक्तीच पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

पुण्यात एका 10 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माहितीनुसार, एका 67 वर्षीय व्यक्तीने पाचवीमाध्येब शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य केले. पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप नामदेव नावाच्या वृद्धाला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विचार करून शनिवारी शाळेत ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ या विषयावर कार्यशाळा सुरू होती. यावेळी विद्यार्थिनीने तिच्या शिक्षिकेला एका काकाने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले.

 

विद्यार्थिनीने शिक्षिकेला सांगितले की, काकांनी तिला घरी नेले आणि जेवणाचे पैसे देऊन तिच्यासोबत गैरकृत्य केले. विद्यार्थिनीनी सांगितलेली गोष्ट ऐकून शिक्षिकेला धक्का बसला. त्यानंतर तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. नंतर मुलीच्या पालकांना तातडीने शाळेत बोलावून याबाबत माहिती देण्यात आली. शिक्षक संघटनेच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *