मुंबईतील एका खासगी शाळेत विद्यार्थीनीला मुलींच्या गटाकडून मारहाण,पहा व्हिडीओ

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

 

मुंबईतील (Mumbai) एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला मुलींच्या गटाने मारहाण (Beaten) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना वर्सोव्यातील यारी रोड परिसरात झाली आहे. काही मुलींनी शाळेतल्या विद्यार्थ्याला भररस्त्यात बेदम मारहाण केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, एका शाळकरी विद्यार्थींनीला दिवसाढवळ्या मुलींच्या गटाने मारहाण केली. माराहाण करताना मुलींनी तिला शिवीगाळ केली. पीडितेचे केस ओढले आणि तिला लाथ देखील मारली. पीडितेने स्वत: ची कशीबशी सुटका केली आणि तिच्या मित्राकडे पोहचली. मात्र, तिथे देखील पीडितेला पकडण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. तीला घाण पाण्याच्या टबक्यात टाकण्याचा प्रयत्न केला.

 

मुलींच्या टोळक्याकडून मारहाण

ही घटना एकाने फोनमध्ये कैद केली. मारहाणीच्या वेळीस अनेक जण रस्त्यावर उपस्थित होते परंतु पीडित मुलीला वाचवण्यासाठी कोणीही गेले नाही. पीडितेला का मारहाण केली हे अद्याप समजले नाही. या प्रकरणी कार्यकत्या दिपीका यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी दखल घ्यावी या करिता मुंबई पोलिसांना टॅग केले आहे. पोस्टपर तीने कॅप्शन देखील लिहले आहे. मुंबईतील यारी रोड येथील शाळेत जाणाऱ्या मुलीला मुलींच्या टोळीने बेदम मारहाण केली.

 

पहा व्हिडीओ:


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *