मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नावं बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना महत्वाची माहिती सांगितली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून जगन्नाथ नाना शंकरशेठ असं करण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून मी सभागृहाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा अतिशय भव्य असा पूर्नविकासाचा प्रकल्प सुरु आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होतंय. हे तयार करताना जो आराखडा तयार करण्यात आलेला आहे, त्या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.