लेखणी बुलंद टीम:
पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 दिवासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 6 ऑक्टोबर या कालावधीत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.
गोरेगाव-कांदिवली विभाग हा वांद्रे टर्मिनस आणि बोरिवली दरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गाचा भाग आहे. वांद्रे टर्मिनस-बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका आणि खार रोड-गोरेगावदरम्यान सहावी मार्गिका सुरु झाली आहे. आता गोरेगाव कांदिवलीदरम्यान 4.5 किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरु होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास 66 ते 700 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवदरम्यान मार्गिकेचे काम थांबवणार-
ब्लॉकदरम्यान गणेशोत्सव असल्याने 11 ते 17 सप्टेंबर या कालावधीत मार्गिकेचे काम करण्यात येणार नाही, असं रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये केवळ 130-140 गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मेगाब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर पाचव्या, 12 व्या, 19 व्या, 26 व्या आणि 33 व्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाचे दिली. नोव्हेंबर 2023 मध्ये पश्चिम रेल्वेने सांताक्रूझ-गोरेगाव कॉरिडॉरवरील या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला. गोरेगाव आणि कांदिवली विभागात सुधारणा करण्यासाठी हा विस्तार कायम राहणार आहे. सदर प्रकल्प 2008 मध्ये सुरु झाला असून डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मार्गिकेचा फायदा काय?
1. बिझी उपनगरी रेल्वे मार्ग आणि मुख्य मार्गावरील रहदारीची घनता कमी होईल.
2. लोकल गाड्यांच्याही वक्तशीरपणात सुधारणा होईल.
3.वांद्रे टर्मिनसवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेससाठी दोन मार्गिका असतील.
4.लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका मिळेल, उपनगरीय वाहतुकीवर या गाड्यांचा ताण येणार नाही.
5. जास्त गाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध असतील.
Project Name: Commissioning of 6th Line Between Goregaon and Kandivali Stations
Length: Approx. 4.5 km
Duration: 42 days (35 working days)
Start Date: Night of August 27/28, 2024
कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू-
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या काळात रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. परंतु रेल्वे प्रशासनाकडून अतिजलद गाडीच्या निकषांत कोणताही बदल किवा शिथिलता आणली जात नाही, असे मत कोकण रेल्वे समितीने व्यक्त केले आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वे मंडळ, रेल्वे विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
पहा पोस्ट:
Project Name: Commissioning of 6th Line Between Goregaon and Kandivali Stations
Length: Approx. 4.5 km
Duration: 42 days (35 working days)
Start Date: Night of August 27/28, 2024Project Overview:
· The 6th line will be laid east of the existing tracks from Goregaon to Malad (S)… pic.twitter.com/CQ2sGX9d2t— DRM – Mumbai Central, WR (@drmbct) August 26, 2024