लेखणी बुलंद टीम:
राज्यात राज्य सरकार आता पैसे उभारण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबवत आहे. आता महाराष्ट्रात सरकारी बसचा प्रवास महागणार आहे. सरकारी बसच्या तिकिटांच्या दरात आजपासून 15 टक्के वाढ करण्यात आली. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे.
गुरुवारी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली , त्यांनतर हा निर्णय घेण्यात आला.सरकार ने महाराष्ट्रात मोफत सेवा सुरु केली होती. या मोफत सेवेमुळे महाराष्ट्र सरकारच्या परिवहन सेवेला दरमहा 90 कोटी रुपयांचा तोटा होत होता. आता हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने भाड़ेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.