राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आणि आमदारांची महत्त्वाची बैठक हॉटेल ताज लँड्समध्ये होत आहे. या बैठकीनंतर ठाकरेंकडून सर्व आमदार आणि खासदारांना जेवणाचं देखील आमंत्रण देण्यात आलं आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असून, त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून आता डिनर डिप्लोमसीचा आधार घेतला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना खास जेवणासाठी आमंत्रित केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आणि आमदारांची महत्त्वाची बैठक हॉटेल ताज लँड्समध्ये होत आहे. या बैठकीनंतर हा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.
एकीकडे शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. तर ठाकरे गटातील खासदार देखील शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सूत्रांकडून मिळाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळी थांबवण्याचं मोठं आवाहन शिवसेना ठाकरे गटासमोर आहे, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही डिनर डिप्लोमसी महत्त्वाची ठरणार आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती, आघाडी म्हणून लढवल्या जाणार की, स्वबळाची परीक्षा घेतली जाणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची देखील चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या डिनर जिप्लोमसीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठकीला काही आमदार, खासदारांची दांडी
दरम्यान या बैठकीला काही आमदार आणि खासदार अनुपस्थित असल्याचं देखील पाहायला मिळालं.
बैठकीसाठी उपस्थित असलेले आमदार
सिद्धार्थ खरात आदित्य ठाकरे कैलास पाटील बाबाजी काळे सुनील शिंदे नितीन देशमुख भास्कर जाधव राहुल पाटील महेश सावंत बाळा नर अंबादास दानवे सुनील प्रभू विलास पोतनीस गजानन लवटे अनिल परब मिलिंद नार्वेकर