आता कोकण-गोव्यात आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.
मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार धुमशान सुरू आहे. अचानक येणार्या वादळी वारा, पाऊस आणि सोबतच वीजांचा कडकडाट मुळे मे महिन्यातच पावसांच्या दिवसांचा अनुभव मिळत आहे. यामध्येच आता सायक्लॉन शक्ती मुळे सध्या अरबी समुद्रामध्ये ECMWF मॉडेल च्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा समुद्र किनारी भागाजवळ राहणार आहे. त्यामुळे विकेंडला किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आता कोकण-गोव्यात (Kokan-Goa) आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.