नैसर्गिक पद्धतीने निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर ‘या’ पद्धतीने चहा बनवा

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

प्रत्येकाला आपली त्वचा चमकदार आणि निरोगी कशी राहिल यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतात. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रूटिंग करतात. अशातच तुम्हाला तुमची त्वचा नेहमीच तरूण आणि चमकदार राहावी असे वाटत असेल तर दररोज सकाळी आवळा चहा पिण्यास सुरूवात करा. कारण आवळा हा अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, जो नैसर्गिक पद्धतीने कोलेजन वाढविण्यास मदत करतो. तुमची त्वचा घट्ट, सुरकुत्यामुक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन आवश्यक आहे. त्यात वय वाढत असताना, शरीरात कोलेजनचे उत्पादन कमी होऊ लागते, ज्यामुळे त्वचा सैल आणि निर्जीव दिसू लागते. पण जर तुम्ही तुमच्या आहारात आवळा चहाचा समावेश केला तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.

कोलेजन हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कारण कोलेजन केवळ त्वचेसाठीच नाही तर हाडे, सांधे आणि केसांसाठी देखील महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात कोलेजनचे प्रमाण योग्य असल्यास त्वचा घट्ट आणि लवचिक ठेवते. आवळा चहा केवळ त्याचे उत्पादन वाढवत नाही तर शरीराला आतून डिटॉक्सिफाय करतो, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हेल्दी दिसते. सकाळी रिकाम्या पोटी आवळा चहा पिणे सर्वात फायदेशीर आहे. तथापि, आवळा चहासोबत संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे.

आवळा चहा कसा बनवायचा?
आवळा चहा बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त 1 चमचा सुका आवळा पावडर किंवा 2-3 ताजे आवळा तुकडे लागतील. एक कप पाणी उकळवा आणि त्यात आवळा घाला. मंद आचेवर 5-7 मिनिटे उकळुन द्या. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात मध किंवा लिंबू देखील मिक्स करू शकता. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ते प्यायल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळतील. जर तुम्ही तुमच्या सकाळच्या दिनचर्येत हे समाविष्ट केले तर तुम्हाला अनेक आरोग्य फायदे देखील मिळतील. यामुळे तुमची त्वचा निरोगी तर राहीलच पण पचनक्रियाही सुधारेल. आवळा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्त शुद्ध होते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि चमकदार दिसते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *