मोबाईलच्या स्लो चार्जिंग स्पीडला तुम्ही कंटाळला आहात तर करा ‘हे’ उपाय

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक कामे फोनवरून झटपट होतात. फोन चुकूनही आपण विसरलो की आपली सर्व कामे अडकुन राहतात. त्यामुळे ‘फोनशिवाय माणूस’ ही कल्पनाही आपण करू शकत नाही. या फोनची विशेष काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येकाला फोनची गरज असते पण जेव्हा फोनची बॅटरी चार्ज असेल तेव्हाच आपला फोन सुरू असतो. परंतु फोनची चार्जिंग संपली की आपण फोन चार्जिंगला लावतो पण बरेच लोकं तक्रार करतात की फोन हळू चार्ज होत आहे. अशी समस्या एक-दोन लोकांसोबत होत नाही तर अनेक लोकांसोबत होते. तुम्हालाही अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत आहे का? तर आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखात फोन स्लो चार्ज का होत आहे यांचे नेमके कारण सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

चार्जिंग जॅकमध्ये समस्या

तुमच्या मोबाईल फोनचा चार्जिंग जॅक खराब झाला असेल, तर अशावेळी तुमचा फोन खूप स्लो चार्ज होईल. चार्जिंग जॅक हा तो भाग आहे जिथे तुम्ही डेटा केबल फोनला जोडता. आता हेच चेक करण्यासाठी तुमचा फोन सर्व्हिस सेंटर किंवा जवळच्या मोबाईल दुरुस्ती दुकानात घेऊन जा आणि चार्जिंग जॅक खराब झाला नाही याची खात्री करण्यासाठी त्याची तपासणी करा.

तुम्ही ज्या चार्जरने तुमचा फोन चार्ज करत आहात तो कदाचित खराब असल्यास तुमचा फोन खूप स्लो चार्ज होण्याची शक्यता असते आणि त्यांचा परिणाम मोबाईलच्या बॅटरीवर होतो. त्यामुळे अॅडॉप्टर आणि चार्जिंग केबल दोन्ही तपासण्यासाठी सर्व्हिस सेंटर किंवा जवळच्या मोबाईल दुरुस्ती दुकानात जा आणि केबल किंवा अ‍ॅडॉप्टरमध्ये जे काही खराब झाले आहे ते ताबडतोब बदलून घ्या.

फोन चार्ज होत असताना वापरणे

काही लोकांना मोबाईल चार्जिंग होत असताना वापरण्याची वाईट सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल तर तुमची ही सवय बदला. कारण असे केल्याने फोन खुप हळु चार्ज होतो, शक्य असल्यास फोन फ्लाइट मोडमध्ये किंवा तो बंद करून चार्ज करावा. असे केल्याने फोन थोडा जलद चार्ज होऊ शकतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *