हिवाळ्याच्या मोसमात फिरण्याचा बेत आखताय, मग ‘ही’ आहेत सर्वोत्तम पर्यटनस्थळे

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

सुट्टीचे दिवस सुरु झाले कि प्रत्येकाला फिरायला आवडतं. थंडीचे दिवस सुरु झाले आहे. अशा तऱ्हेने बहुतांश लोकं कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा बेत नक्कीच आखत असतात. डिसेंबर हा वर्षातील तोच महिना असतो, जेव्हा मुलांना हिवाळ्याच्या सुट्ट्या असतात. आता गुलाबी थंडीलाही सुरुवात झाली आहे. या ऋतूत लोक उबदार ठिकाणी फिरण्याचा बेत आखतात. जर तुम्ही डिसेंबरच्या थंडीत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खास आहे. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला किंचितही थंडी जाणवणार नाही. या ठिकाणी तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसमवेत आरामात सहलीचे नियोजन करु शकता.

गोवा : डिसेंबरच्या थंडीत तुम्ही गोव्याला जाऊ शकता. या महिन्यात तापमान २१ ते ३२ अंशांपर्यंत असते. या काळात तुम्ही गोव्याला गेल्यावर तुम्हाला थंडी जाणवणार नाही. या हंगामात अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. या ठिकाणी तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर तुमच्या प्रियजनांसह मस्त एन्जॉय करू शकता.

जैसलमेर : लोकप्रिय डेस्टिनेशनमध्ये राजस्थानमधील एखाद्या ठिकाणाचे नाव नसेल असे होऊ शकत नाही. डिसेंबरमध्ये फिरायला जाणार असाल तर जैसलमेरला भेट द्या. या ठिकाणी डिसेंबरमध्ये तापमान २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत असते. जैसलमेर किल्ला, पाटों की हवेली, तनोट माता मंदिर आणि गदिसर तलावाला भेट देऊ शकता. हिवाळ्यातील ट्रिप कुटुंबासोबत मस्त फिरू शकता.

गोकर्ण : डिसेंबरमध्ये गोकर्णाचे तापमान २२ ते ३४ अंशांच्या दरम्यान असते. गोकर्णात अनेक भव्य आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. गोकर्ण हे हिंदू तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे भगवान शंकराचे मंदिरही आहे.

‘ही’ ठिकाणंही आहेत परफेक्ट

याशिवाय मुंबई, गुजरातमधील रन ऑफ कच्छ आणि केरळमधील कोवलम यासारख्या ठिकाणांची ट्रिप प्लॅन करू शकता. इथे जाऊन तुम्ही अनेक ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे यंदाच्या डिसेंबरमध्ये ही डेस्टिनेशन्स चुकवू नका.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *