आता भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकींगची मर्यादा निश्चित केली जाणार आहे.एकूण तिकीटांच्या केवळ २५ टक्के तिकीटांनाच वेंटीगसाठी ठेवले जाणार आहे. त्यामुळे आता तिकीट कन्फर्म होणार की नाही प्रवास करायचा की नाही या अनिश्चितेतून सुटका होणार आहे. तिकीटांना मर्यादीत वेटींग दिल्याने तिकीट कन्फर्म होण्याची संधी अधिक असणार आहे.
रेल्वेच्या नव्या नियमानुसार AC फर्स्ट क्लास, सेकेंड आणि थर्ड, स्लीपर आणि चेअर कार- अशा प्रत्येक श्रेणीत एकूण सीटच्या कमाल २५ टक्के हिस्सा वेटिंग तिकीटाच्या स्वरुपात बुक केला जाऊ देणार आहे. म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये जर ८०० सीट असतील तर केवळ २०० तिकीटच वेटींगमध्ये जातील त्यानंतर त्या क्लासाची तिकीट बुक होणार नाही.
सध्या वेटिंग तिकीट जादा जारी केले जात असल्याने कन्फर्म तिकीटांशिवाय अनेक वेटिंग तिकीट वालेही आरक्षित डब्यात घुसखोरी करतात. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. आणि मुळ आरक्षित प्रवाशांना अडचण होत असते. रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की नव्या नियमांमुळे बेकायदेशीर प्रवाशांची डब्यातील घुसखोरी कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व झोनल रेल्वेना हे परिपत्रक पाठवून त्यास लागू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक झोन त्यांच्या क्षेत्रातील बुकींग आणि कॅन्सलेशनच्या ट्रेंडच्या आधारे हे निश्चित करणार की ट्रेनमध्ये किती तिकीटे वेटिंगची द्यायची. म्हणजेच हा नियम लवचिक असणार आहे. परंतू २५ टक्क्यांच्यावर वेटिंगची तिकीटे दिली जाणार नाही.
जुनी सिस्टम आता लागू
जानेवारी 2013च्या नियमानुसार, आधी वेटिंगची मर्यादा AC1 मध्ये 30, AC2 मध्ये 100, AC3 मध्ये 300 आणि स्लीपरमध्ये 400 तिकीटांपर्यंत होती. अनेकवेळा तिकीट तर बुक व्हायचे परंतू शेवटच्या क्षणी कन्फर्म होत नसायचे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागायचा. आता रेल्वेचा फोकस ‘क्वालीट बुकींग’वर राहणार आहे. जो तिकीट बुक झाली तर प्रवासाची हमी देखील देईल…
प्रवाशांना स्पष्टता आणि आराम मिळेल
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या बदलामुळे प्रवाशांना तिकीट कन्फर्म होईल की नाही हे आधीच कळेल. यामुळे अनावश्यक वाट पाहणे आणि तिकीट कन्फर्मेशनच्या अनावश्यक अपेक्षा दूर होतील. कन्फर्म तिकिटाची शक्यता वाढेल आणि प्रवासाची तयारी करणे सोपे जाईल.
नवीन नियम त्यांना लागू होणार नाही
भारतीय रेल्वेचा नवीन वेटिंग तिकिट नियम अशा प्रवाशांना लागू होणार नाही जे सवलतीच्या तिकिटांवर प्रवास करतात किंवा ज्यांची तिकिटे सरकारी वॉरंटद्वारे जारी केली जातात. याचा अर्थ असा की जर एखाद्या अपंग प्रवाशाने सबसिडीचे तिकीट बुक केले तर त्याला ही २५% प्रतीक्षा मर्यादा लागू होणार नाही. त्याचप्रमाणे, लष्करी कर्मचाऱ्यांना दिलेल्या लष्करी वॉरंटवर हा नियम लागू होणार नाही.