लेखणी बुलंद टीम:
खवय्यांना नेहमी चमचमीत खाद्यपदार्थ आवडत असतात. कुठेही गरमा गरम खाद्यपदार्थ दिसल्यास त्याची चव घेण्याचा मोह सुटत नाही. परंतु पेपरात खाद्यपदार्थ खाणे धोकादायक आहे. ते आजारांना आमंत्रण देणारे ठरणार आहे. कर्करोग (कॅन्सर) सारखा आजार त्यामुळे होण्याचा धोका आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. हेमेटोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. पेपरात खाद्यपदार्थ खाणे का घातक आहे? त्याची माहिती त्यांनी या व्हिडिओतून दिली आहे.
प्रसिद्ध हेमेटोलॉजिस्ट आणि ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्यांवर जे पेपरात बांधून खाद्य पदार्थ मिळतात त्यात तळलेली भजी खाणे धोकादायक आहे. त्या भजीपेक्षा जास्त नुकसान तुम्हाला त्या पेपरामुळे होते. जेव्हा तुम्ही फ्राय केलेले खाद्यपदार्थ त्या पेपरात बांधतात, तेव्हा त्यातील केमिकल्स आणि इंकचे एक्सपोजर येतात. वृत्तपत्रात वॉलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंड असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
हेमेटोलॉजिस्ट डॉ. रवी गुप्ता पुढे म्हणतात, वृत्तपत्र कसे बनते, ते तुम्हाला माहीत आहे का? वृत्तपत्र कसे बनतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे. त्यात धूळ, बॅक्टीरिया आणि इतर घाण असते. त्यामुळे खाद्यपदार्थला चिकटून अनेक आजार तुमच्या शरीरात जातात.