राजधानी दिल्लीमध्ये कल्याणपुरी भागातील खिचडीपूरयेथे निर्दयी पतीने स्वतःची पत्नी आणि मुलाला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. हल्लेखोर पतीने अलीगड येथील आपल्या घरी जाऊन शेतात गळफास लावून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण परस्पर वादातून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील खिचडीपूर मध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी पतीने रागाच्या भरात पत्नी आणि 15 वर्षांचा मुलावर वार केले. पत्नी आणि मुलाला अशा अवस्थेत सोडून तो तेथून पळून गेला आणि उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील घरी पोहोचला. शेतात जाऊन त्याने गळफास लावून घेतला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला आणि तिच्या मुलाला शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. उपचारानंतर मुलाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. कल्याण पुरी पोलिस स्टेशन आरोपी संजयच्या अलीगडमधील घरी पोहोचले. आरोपीने शेतात गळफासही घेतल्याचे पोलिसांना समजले.