पावसाळ्यात त्वचेच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण कसे कराल? घ्या जाणून

Spread the love

लेखणी बुलंद टीम:

पावसाळा हा ऋतू उष्णतेच्या कडाक्यापासून आराम घेऊन येतो. आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो तर काहींना नाही. सध्या हवामानात संतुलन राखण्यासाठी तसेच शेती क्षेत्रासाठी तसेच पृथ्वीवरील जीवनासाठी हे खूप महत्वाचे आहे. तर पावसाळा या हंगामात फायद्यांसोबतच काही नुकसान देखील आहेत. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे या ऋतूत अनेक आजार होण्याची भीती असते आणि अनेकांना त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवू लागतात. बुरशीजन्य संसर्ग म्हणजेच फंगल इंफेक्शन टाळण्यासाठी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात त्वचचे संसर्ग होण्याचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे या ऋतूत तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टी आधीच लक्षात ठेवल्या तर त्या टाळता येतात, जेणेकरून तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागणार नाही. फंगल इंफेक्शन टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.

त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवा

त्वचचे संसर्ग टाळण्यासाठी त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणे खूप महत्वाचे आहे. आंघोळ केल्यानंतर ताबडतोब टॉवेलने स्वतःला पुसून घ्या आणि मान, पाय आणि काखेच्या दरम्यानच्या भागाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा टॅल्कम पावडर वापरा आणि तुमची त्वचा सुती कापडाने पुसून टाका.

पावसात भिजल्यानंतर करा हे काम

जर तुम्ही पावसात भिजला असाल तर त्यानंतर घरी गेल्यावर लगेच साध्या पाण्याने आंघोळ करा. पावसात भिजल्यानंतर डोके स्वच्छ करा. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका. यामुळे पुरळ आणि मुरुम यासारख्या समस्या उद्भवतात.

पावसाळ्यात बाहेरून येताना घ्या अशी काळजी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कामावरून किंवा इतर कुठूनही घरी आल्यावर लगेच घरामध्ये वावरू नका. त्याआधी येऊन हातपाय धुवा. विशेषतः जर तुमचे पादत्राणे ओले झाले तर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कारण पावसाळ्यात पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे संसर्ग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

उन्हात कपडे वाळवा

बऱ्याचदा पावसात कपडे दमट राहतात. त्यामुळे असे कपडे घालणे टाळा. तुमचे कपडे, टॉवेल इत्यादी योग्यरित्या उन्हात ठेवा. विशेषतः अंतर्वस्त्रे फक्त उन्हात वाळवा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर स्वतःवर उपचार करण्याऐवजी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *