१ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ
अर्धी वाटी आंबट ताक
अर्धी वाटी कोमट पाणी
आलं
मिरची बारीक करून
अर्ध्या लिंबाचा रस
अर्धा टे.स्पून तेल
हळद
पाव चमचा खाण्याचा सोडा
तेलाची फोडणी
साखर 1 चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
पाककृती:
एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून भिजवून पातेल्यात ५ ते ६ तास झाकून ठेवावे.
पीठ फुगून वर आले की त्यात आले, मिरची, मीठ, हळद, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा चमचा तेल घालावे.
इडली पात्रात तळाला पाणी घालून गॅसवर ठेवावे, इडली पात्रातील ताटल्यांना तेल लावावे. पाण्याला उकळी आली की मिश्रणात सोडा घालून चांगले हलवून इडलीपात्रात ठेवावे. (पिठात सोडा अगदी पीठ इडली पात्रात घालायच्या वेळीच घालावा.)
ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करून घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होऊ द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
१० ते १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनिटांनी पात्र बाहेर काढावे. इडली ढोकळा जरा गार झाला की पात्रातून काढून त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी आणि कोथिंबीर घालावी.